Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 32 हजार फलक हटविले

एमपीसी न्यूज – भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ( Loksabha Election 2024 ) मावळ, पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत शासकीय जागेतील 11 हजार 83, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे 19 हजार 652 आणि खाजगी जागेवरील 1 हजार 815 असे एकूण 32 हजार 550  जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज हटविण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली आहे.

Today’s Horoscope 19 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

जिल्ह्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिते पालन काटेकोरपणे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने 33 मावळ लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील 961, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे 2 हजार 552, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे 207, 34 पुणे लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील 785,

सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे 1 हजार 431, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे 257, 35 बारामती लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील 4 हजार 488, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे 5 हजार 281, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे 232 तर 39 शिरूर लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील 4 हजार 849, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे 10 हजार 388,  खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे 1 हजार 119 असे एकूण 32 हजार 550 जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज हटविण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आदर्श आचारसंहितेचे कटाक्षाने  पालन व्हावे म्हणून उपाययोजना करण्यात येत ( Loksabha Election 2024 ) आहेत. जिल्ह्यातील सर्व जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज पूर्णपणे हटविण्याची कार्यवाही सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.