Pune : रिकाम्या खुर्च्या बघून स्मृती इरानींचा काढता पाय

एमपीसी न्यूज- दो धागे श्रीराम के लिये या कार्यक्रमासाठी (Pune)भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ह्या पुण्यात आल्या होत्या. यावेळी प्रभु श्रीरामांसाठी हातमागावर त्यांनी प्रतिकात्मक वस्त्र विणलं.

पण त्यानंतर त्यांची पुण्यात या कार्यक्रमाच्या शुभारंभानिमीत्त एक सभाही होणार (Pune)होती. पण सभास्थळी अपेक्षित गर्दी न जमल्यामुळे आणि अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या असल्यामुळे सभेला संबोधित न करताच त्यांनी काढता पाय घेतला. पुण्यातल्या सभेला हजेरी न लावताच मुंबईतल्या एका कार्यक्रमासाठी स्मृती ईराणी निघुन गेल्या.

Pune : महानगरपालिकेतील एकवट मानधनावरील कर्मचारी कायमस्वरूपी रुजू होण्याच्या प्रस्तावाला मान्यता

याबाबत विचारणा केल्यावर मुंबईत पुर्वनियोजित कार्यक्रम होता त्यासाठीच इराणी गेल्या त्यामुळे गर्दीचा याच्याशी संबंध नाही असं स्पष्टीकरण आयोजकांनी दिलंय.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.