Pimpri : …..तर पुणे, पिंपरी – चिंचवड महापालिकेची चौकशी का करत नाही?

आगामी काळात मोर्चा काढण्याचा सचिन अहिर यांचा इशारा

एमपीसी न्यूज – कोविड काळात केलेल्या कामांची मुंबई महापालिकेची ( Pimpri) चौकशी करत असाल तर पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेची चौकशी का करत नाही, असा संतप्त सवाल शिवसेना नेते सचिन अहिर यांनी उपस्थित केला आहे. आगामी काळात पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी मोर्चा काढू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

Pune : रिकाम्या खुर्च्या बघून स्मृती इरानींचा काढता पाय

कोरोना काळात सेंटर उभारण्यासाठी कोणीही तयार नव्हते. त्या काळात माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन कोरोना काळात जबरदस्त काम केले. तर, सुमारे 6 हजार कोटी बजेट असलेल्या पुणे महापालिकेला रुग्णवाहिका नसल्याने एका पत्रकाराचा मृत्यू होणे दुःखदायक असल्याचे शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांनी सांगितले. कोरोना काळात पुणे महापालिकेत प्रचंड घोटाळा झाला. टँकर, फुटपाथ घोटाळा झाला आहे. कोरोनाच्या भ्रष्ट कारभारामुळे अधिकाऱ्यांना अटकही झाली. त्यावर कोणी काहीही बोलायला तयार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हिवाळ्यात नागपूर अधिवेशनात सहलीसाठी जातात की काय, असा प्रश्न पडतो. आज महाराष्ट्रातून असल्याचे सांगताना लाज वाटते. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविल्याशिवाय सभागृह चालवू देणार नाही. जे खासदार, आमदार सोडून गेले यांना आता धनुष्यबाण न घेता कमळ आणि घड्याळवर निवडणूक लढवावी लागेल. उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत जिल्हा मेळावा व्हावा, अशी मागणी असल्याचे अहिर यांनी ( Pimpri)  सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.