Pune : राष्ट्रीय लोक अदालतीत पुणे जिल्ह्यात 83 हजार दावे निकाली

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय लोकअदालतमध्ये पुणे जिल्ह्याने प्रलंबित 33 हजार 359 आणि (Pune) दाखलपूर्व 50 हजार 458 असे एकूण 83 हजार 817 प्रकरणे निकाली काढले. लोकअदालतीमध्ये सर्वाधिक प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने सातत्याने प्रथम क्रमांक कायम राखला असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणेचे अध्यक्ष के. पी. नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत आयोजित करण्यात आली.

Pimpri : …..तर पुणे, पिंपरी – चिंचवड महापालिकेची चौकशी का करत नाही?

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे तर्फे विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 मधील तरतुदी अंतर्गत राज्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे व तालुका विधी सेवा समित्याद्वारे अशा प्रकारच्या लोकन्यायालयांचे वेळोवेळी आयोजन करण्यात येते. लोकअदालत किंवा लोक न्यायालय हे एक अनोखे व्यासपीठ आहे जिथे विवाद लवकर आणि परवडण्याजोगे सोडवले जातात.

लोकअदालतीमध्ये मोठ्या प्रमाणात खटल्यांचा यशस्वी (Pune) निपटारा हा न्यायालयाच्या सक्रिय दृष्टिकोनाचा आणि पारंपारिक न्यायव्यवस्थेवरील भार कमी करण्याच्या क्षमतेचा पुरावा आहे. खटल्यांचा अनुशेष कमी करण्यासाठी आणि वेळेवर न्याय मिळेल याची खात्री करण्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे.

राष्ट्रीय लोक अदालतीला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायीक अधिकारी, जिल्ह्यातील सर्व तालुका विधीज्ञ संघटना, विविध शासकीय आणि सामाजिक संस्था, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.