Pune : महिला, उपेक्षित घटकांच्या मतदार नोंदणीसाठी 2 व 3 डिसेंबर रोजी विशेष शिबीरे

एमपीसी न्यूज – राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (Pune) यांच्या निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात शनिवार (दि. 2) व रविवार (दि. 3) या सुट्टीच्या दिवशी महिला तसेच तृतीयपंथीय, देहविक्री व्यवसायातील महिला आणि भटक्या व विमुक्त जमाती या उपेक्षित घटकांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांकडून दावे व हरकती म्हणजेच नागरिकांकडून मतदार नोंदणीचे, मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज 9 डिसेंबर पर्यंत मागविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत सर्व पात्र महिला तसेच उपेक्षित घटकांची मतदार नोंदणीही व्हावी यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे भारत निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांचे निर्देश आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यंत्रणेला निर्देश दिले की, महिलांकरीता शिबीरे आयोजित करण्यापूर्वी महिलांसाठी कार्य करणाऱ्या महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या शासकीय संस्था, तसेच अशासकीय संस्थांच्या जिल्हा प्रातिनधींसोबत चर्चा करावी. तृतीय पंथीयांसाठी शिबीरे आयोजित करण्यापूर्वी तृतीयपंथीय व्यक्तीकरीता कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींशी करुन अधिक वस्ती असलेल्या ठिकाणांची निवड करावीत.

Alandi : कार्तिकी यात्रा अवघ्या काही दिवसांवर अन् इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली

देहविक्री व्यवसायातील महिलाकरीता शिबीरे आयोजित करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटीच्या क्षेत्रिय (Pune) अधिकाऱ्यांशी तसेच भटक्या व विमुक्त जमातीकरीता शिबीरे आयोजित करण्यापूर्वी त्या जमातीसाठी कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांशी चर्चा करुन शिबीरे आयोजित करावीत, अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

या शिबीराचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेऊन मतदान नोंदणी करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.