Alandi : कार्तिकी यात्रा अवघ्या काही दिवसांवर अन् इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली

एमपीसी न्यूज : कार्तिकी यात्रा अवघ्या (Alandi) काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. त्यातच आज दि.1 रोजी आळंदी येथील इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळे फेसाळलेली दिसून आली. इंद्रायणी नदीच्या काठी असणाऱ्या काही कारखान्यातून प्रक्रिया न केलेले रसायनयुक्त सांडपाणी व तसेच नदी काठच्या गावातून मोठ्या प्रमाणात मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्याने आज शुक्रवारी रोजी इंद्रायणी नदी पूर्ण फेसाळलेली दिसत होती.

नदीपात्रात साबणाच्या पाण्यासारखा फेस दिसून येत होता. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या निमित्ताने लाखो वारकरी भाविकांचे आळंदीमध्ये आगमन होते. तसेच पवित्र अश्या इंद्रायणी नदीमध्ये आलेले लाखो भाविक स्नान करत असतात.

Talegaon MIDC : तळेगाव- चाकण एमआयडीसी रस्ते प्रकल्पाच्या जमिनीचा कवडीमोल मोबदला देऊन शेतकऱ्यांची टिंगल – रामदास काकडे

या झालेल्या जलप्रदूषणामुळे मानवास अनेक त्वचा विकार उदभवू शकतात. तसेच नदी काठी असणाऱ्या विहिरी, कूपनलिका(Alandi) यांच्या पाण्यावर परिणाम होऊन ते पिण्यास अपायकारक होऊ शकते. ही बाब गंभीरअसून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सातत्याने त्यावर लक्ष देणे गरजेचे असून जलप्रदूषण करणाऱ्यांवर त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे गरजेचे आहे.

कार्तिकी यात्रा अवघ्या काही दिवसांवर वरच येऊन ठेपलेली आहे. त्यात इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळे फेसाळली. त्यामुळे आळंदीकर नागरिकांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.