Loni Kalbhor : पोलीस कर्मचाऱ्यांनी टाकला पोलीस ठाण्यातच दरोडा; पुणे शहर पोलिस दलातील 4  पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा प्रताप

एमपीसी न्यूज – पोलीस कर्मचाऱ्यांनी  पोलीस ठाण्यातच  दरोडा  ( Loni Kalbhor ) टाकल्याने  4  पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.या पोलीस कर्मचाऱ्यांनी गुन्ह्यातील जप्त केलेल्या दुचाकी   विकल्या.

दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे  अशी  पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल यात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. या आरोपीकडून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या आरोपीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यानेच

Pune : आपणासोबत मिळून पुणे विकसित बनवायचे आहे – सुनील देवधर

काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले अशी कबुली या आरोपीने दिली. तसेच या गाड्या स्क्रॅपच्या असल्याचे सांगत पोलीस करणाऱ्याने या आरोपीला त्या बाजारात विकण्यास सांगितले.

स्वतच्या आर्थिक फायद्यासाठी आणि लाभासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला हे कृत्य करण्यास भाग पाडले. वेळोवेळी या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशी साठी बोलावले होते मात्र त्यांनी उपस्थिती लावली नाही. परिणामी कर्तव्यात कसूरी केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. काल या 4 पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर पोलीस उपायुक्त यांनी जाहीर( Loni Kalbhor ) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.