Chakan : चाकण भागात महानगरपालिका ही काळाची गरज – राजेश अगरवाल

एमपीसी न्यूज – चाकण मधील सर्व  वाडया, वस्ती व जवळ पास ची गावे मिळून ( Chakan ) महानगरपालिका झाली पाहिजे. अन्यथा ह्या भागाचे बकाली करण दिवसेंदिवस वाढत जातील, असे मत सामाजीक कार्यकर्ते राजेश अगरवाल यांनी व्यक्त केले आहे.

यासंदर्भात राजेश अगरवाल म्हणाले की, पिंपरी-चिंचवड चे भाग्य चांगले होते की  त्यांना  दूरदृष्टी  असलेले नेतृत्व लाभले. 1982 मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हा तेथील लोकसंख्या आणि  कारखानदारी ही सध्याच्या चाकण एम आय डी सि परिसराच्या 5 % सुद्धा नव्हती तरी सुद्धा त्या काळातील  नेत्यांनी खूप चांगला  निर्णय घेतला आणि तिथे महानगरपालिका आणली.

आज पिंपरी -चिंचवड हे एक आदर्श शहार आहे जिथे सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. आज पिंपरी-चिंचवड मध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक  सुंदर  उद्याने आहेत, अनके अत्याधुनिक क्रीडा संकुल आहेत, पोहण्यासाठी अनेक स्विमिंग पूल आहेत, सायन्स पार्क, ऑटो क्लस्टर, मोठं मोठे रुंद रस्ते, अनके उड्डाणपूल, भुयारी मार्ग,  24 तास पाण्याची सोय, स्ट्रीट लाइट, गरिबांसाठी घरे, सांडपाण्याची व्यवस्था, साफसफाई व  स्वछते साठी योग्य ते नियोजन आहे.

Pune : आपणासोबत मिळून पुणे विकसित बनवायचे आहे – सुनील देवधर

महानगरपालिका असल्यामुळे पिंपरी चिंचवडला मोठ्या  प्रमाणात केंद शासन व राज्य शासनाची भरीव आर्थिक मदत मिळते त्यातून त्या भागात मागील 15 ते 20 वर्षात मोठा विकास घडून आला आहे. हेच आदर्श डोळ्यासमोर ठेवून चाकण मधील सर्व  वाडया, वस्ती व जवळ पास ची गावे मिळून महानगरपालिका झाली पाहिजे. अन्यथा ह्या भागाचे बकाली करण दिवसेन दिवस वाढत जातील.

डी. पी. रस्त्यावर लोक अनधिकृत बांधकामे करतील, तिथे अनेक लोक रहायला येतील व त्यानंतर  डी पी रस्ते विकसित करणे अशक्य होतील. वेळेतच नियोजन करून आज चाकण भागात नवीन चांगल्या शाळा , महाविद्यालय, खेळा चे मैदान , उद्याने व इतर सोई सुविधा निर्माण करणे शक्य आहे. महानगरपालिका आल्यास ह्या भागातील जमीनीला सुद्धा खूप चांगला भाव मिळेल.संबधीत लोक प्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी ह्या संदर्भात जलद गतीने पावले उचलण्याची गरज आहे, असे मत अगरवाल यांनी ( Chakan ) मांडले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.