Pune : टॅंकर व दुचाकीची एकमेकांना धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : सेनापती बापट रोड जंक्शन जवळ दुचाकीस्वाराचा (Pune) अपघात होऊन तरुणाचा जागीच मृत्यू झाला . पुण्यातील सेनापती बापट रोडवर सकाळच्या सुमारास हा अपघात झाला असून टॅंकर व दुचाकीची एकमेकांना धडक झाली. 

Yerawada : येरवडा कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; पुन्हा एकदा सापडले मोबाइल

अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला आहे. अद्याप त्याची ओळख पटली नसून पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

दुचाकीस्वाराचा मृतदेह ससून हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.