Pune Bogus Recruitment:आता शिक्षणसंस्थाही ईडीच्या रडावर, पुण्यातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची ईडीकडून चौकशी

एमपीसी न्यूज: राज्यातील शिक्षण संस्था आता ईडीच्या रडारवर आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेत झालेल्या बोगस शिक्षक भरतीच्या घोटाळ्याची दखल आता ईडीने घेतली आहे. (Pune Bogus recruitment) हे खोट उघडकीस आणणारे पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. येत्या दोन ऑगस्ट रोजी ही चौकशी होणार आहे. शिक्षक भरती मध्ये मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रीग झाल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणात लक्ष घातल्याचे बोलले जात आहे. 

 

काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील आकुर्डी येथील एका शिक्षण संस्थेत बनावट कागदपत्राच्या आधारे शिक्षक भरती केली होती. शिक्षण अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा सर्व प्रकार झाल्याचे तेव्हा चौकशीत उघड झाले होते. 23 बोगस शिक्षकांची भरती झाल्याचा प्रकार आढळला होता. पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी 2019 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. पुणे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख, दत्तात्रय शेंडकर आणि आणखी काही अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

 

 

त्याशिवाय या संपूर्ण प्रकरणात काही संस्था चालकांचाही समावेश आहे. उरुळी कांचन येथील एका शिक्षण संस्थेत बोगस शिक्षकांची भरती केल्याचे दाखवले. त्यानुसार राज्य सरकारकडून पगार काढून घेतले आणि काही वर्षांनी त्याच शिक्षकांना पुन्हा आकुर्डी येथील एका संस्थेत समाविष्ट करून घेतले. (Pune Bogus recruitment) त्यानंतर हा बोगस शिक्षक भरतीचा प्रकार उघडकीस आला होता. किसन भुजबळ यांच्या तक्रारीनुसार तेव्हा 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 

या संपूर्ण प्रकरणात आता इ ईडीने लक्ष घातले आहे. किसन भुजबळ यांनी हे प्रकरण उघडकीस आणल्याने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. येत्या दोन ऑगस्टला ही चौकशी होणार आहे. या बोगस शिक्षण भरती विषयी आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.