Pune : पुणे महापालिकेतील नवीन समाविष्ट गावांची जबाबदारी आता अधिकाऱ्यांच्या खांद्यावर

एमपीसी न्यूज – महापालिका हद्दीत दोन वर्षांपूर्वी समाविष्ट(Pune) झालेल्या 23 गावांतील विकासासाठी महापालिकेकडून 28 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गावांमध्ये सुविधा पुरविणे आणि समस्या सोडविण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर आहे. महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी त्याबाबतचे परिपत्रक काढले आहे.

परीपत्रकानुसार उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश( Pune )करण्यात आला आहे. महापालिकेच्या हद्दीमध्ये जुलै 2021 मध्ये 23 गावांचा समावेश करण्यात आला. महापालिका हद्दीत गावांचा समावेश झाल्यानंतरही या गावातील समस्या कायम राहिल्या असून, महापालिकेकडून पायाभूत सुविधा दिल्या जात नसल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहेत.

Nigdi : ओटास्कीम येथे तरुणाचा खून; एक जण गंभीर जखमी

त्यामुळे समाविष्ट गावात पायाभूत सुविधा पुरविणे आणि विकासकामे मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये कोणत्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी असावेत, हा तिढा निर्माण झाल्याने समितीची स्थापना झालेली नाही. या परिस्थितीत महापालिकेकडून 28 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समाविष्ट गावातील पाणी, कचरा संकलन, रस्ते, सांडपाणी, पावसाळी गटारे, पथदिवे आदी प्रश्न या अधिकाऱ्यांकडून सोडविण्यात येणार आहेत.

अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करताना गावाची हद्द आणि लोकसंख्या विचारात घेण्यात आली आहे. वाघोली, बावधन बुद्रुक ही दोन्ही गावे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठी असल्याने या गावांसाठी एक उपायुक्त, एक सहायक आयुक्त, दोन संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर उर्वरित गावांसाठी स्वतंत्र अधिकारी न देता उपायुक्त आणि सहायक आयुक्तांना दोनपेक्षा जास्त गावांची जबाबदारी देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.