Pune : तुळशीबागेत होणाऱ्या चोरीवर बसणार लगाम; उभारले जाणार टेहाळणी मनोरे

एमपीसी न्यूज – तुळशीबागेत दररोज खरेदीसाठी आलेली (Pune) प्रचंड गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत चोरीचे, लुटमारीचे अनेक गैर प्रकार घडतात. यामुळे कुठेतरी तुळशीबागेचे नाव खराब होत आहे. त्यामुळे तेथील व्यापारी व पोलिसांनी एकत्र येत यावर उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. यासाठी तुळशीबाग व्यापारी असोसिएशन आणि छोटे व्यावासायिक असोसिएशन, विश्रामबाग पोलीस ठाण्यातर्फे महिलांच्या सुरक्षेसाठी टेहळणी मनोरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी, विश्रामबाग पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने, गुन्हे शाखेचे निरीक्षक दादासाहेब गायकवाड, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, छोटे व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र धावडे, रवींद्र रणधीर, विनायक कदम, अरविंद तांदळे, किरण चौहान, राजेंद्र साखरीया, महेश दवे, गणेश घम, योगेश मारणे, प्रदीप इंगळे, अमर शहा, जितेंद्र अंबासनकर, प्रसाद हांडे आदी उपस्थित होते.

Pune News : खडकवासला धरणात दोन मुली बुडाल्या; तर सात मुलींना वाचविण्यात स्थानिकांना यश

या बैठकीत तुळशीबागेतील व्यापारी संघटनेने पोलिसांना टेहळणी मनोरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या समोर आणि अक्षय हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत टेहळणी मनोरे उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तुळशीबागेत घडणारे गैरप्रकार आणि चोरट्यांवर लक्ष (Pune) ठेवण्यासाठी मनोऱ्यांची मदत होणार आहे.
तुळशीबागेतील दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गणवेश देण्याची सूचना पोलिसांनी केली.

रस्त्यावर उभे राहून विक्री करणाऱ्यांना परवानगी दिली जाणार आहे. तुळशीबागेत सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित आहेत. त्यात आणखी काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला. दुकानात प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांना ठेवावे. तुळशीबागेत ध्वनीवर्धक यंत्रणा बसविण्यात येणार असून या यंत्रणेचा वापर करुन सूचना दिल्या जाणार आहेत. महिलांच्या मदतीसाठी भगिनी हेल्पलाईन क्रमांक इलेक्ट्रॉनिक फलकांवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.