Pune : 50 लाखांच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला; चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज : 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी 19 ते 22 वयोगटातील चार जणांनी (Pune) एका तरुण व्यावसायिकाच्या अपहरणाचा कट रचला. मात्र, या व्यावसायिकाच्या सतर्कतेने त्यांचा हा प्रयत्न फसला. त्यानंतर ही आरोपीने या व्यवसायिकाकडे व्हाट्सअप कॉल करून खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा सर्व प्रकार करण्याआधी आरोपींनी याच व्यावसायिकाकडे चार दिवस काम केले. त्याची माहिती गोळा केली आणि त्यानंतर हा सर्व कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सौरभ संजय बनसोडे (वय 21), पवन मधुकर कांबळे (वय 22,), कृष्णा भिमराव भाबट (वय 19, धायरी) व संकेत जाधव (रा. नर्हे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांचे इतर साथीदार पसार झाले आहेत. 35 वर्षीय व्यावसायिकाने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

Pune : तुळशीबागेत होणाऱ्या चोरीवर बसणार लगाम; उभारले जाणार टेहाळणी मनोरे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा ट्रान्सफॉर्मर बनविण्याचा व्यवसाय आहे. ते भारती विद्यापीठ भागात राहतात. घटनेच्या काही दिवस आधी यातील चार आरोपी त्यांच्याकडे कामासाठी गेले होते. तीन ते चार दिवसच त्यांनी काम केले. या दिवसात त्यांनी व्यवसायिकाची माहिती गोळा केली.

त्यानंतर साथीदारांच्या मदतीने अपहरणाचा प्रयत्न केला. 50 लाखांची खंडणी उकळण्याच्या (Pune) उद्देशाने तक्रारदार गेल्या आठवड्यात त्यांच्या कारने कात्रज महामार्गावरून जात असताना कार अडवली. त्यांना चाकूचा धाक दाखवत इतरांनी मारहाण केली. त्यांनी सुटका करून घेतल्यानंतर आरोपींनी दोन दिवसांपुर्वी त्यांना व्हॉट्सअपद्वारे फोन केला. तसेच, त्यांना 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास कुटुंबाला व तुम्हाला जीवे मारू अशी धमकीही दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.