Alandi : वेदश्री तपोवनामधील रक्तदान शिबिरामध्ये 207 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज : वेदश्री तपोवन हवालदार वस्ती, मोशी आळंदी रोड, डुडूळगाव येथे 14 मे रोजी भव्य रक्तदान (Alandi) शिबीर, मोफत नेत्र तपासणी व मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

रक्तदान शिबिरामध्ये 207 जणांनी रक्तदान केले. रक्तदात्यास भेटवस्तूही देण्यात आल्या. यावेळी रक्तदान करणारे माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले म्हणाले, त्यांचे हे 35 वे रक्तदान आहे.

Pune : तुळशीबागेत होणाऱ्या चोरीवर बसणार लगाम; उभारले जाणार टेहाळणी मनोरे

तसेच, मोफत नेत्र तपासणीमध्ये 95 चष्मे मोफ़त देण्यात आले. व मोफत आरोग्य तपासणी येथे नागरिकांची करण्यात आली. मोफत नेत्र (Alandi) तपासणी सुर्या ऑप्टिकल खुशांत त्रिवेदी तर मोफत आरोग्य तपासणी कमलेश हॉस्पिटलचे डॉ. अक्षय शिंगणे, डॉ.भूषण जगताप, जगताप क्लिनिकचे डॉ.सुनील जगताप, चव्हाण हॉस्पिटलचे डॉ.योगेश चव्हाण, डॉ.अमित लिमळे, धारा हॉस्पिटल डॉ. सुहास गायकवाड यांच्या सहकार्याने पार पडले. याबाबत माहिती आयोजक राहुल चव्हाण (सामाजिक कार्यकर्ते) यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.