Pune : खडकीतील वाहतूक प्रश्न लवकरच सुटेल – आमदार सिद्धार्थ शिरोळे

जुना मुंबई -पूणे महामार्ग कामाचा आढावा

एमपीसी न्यूज – जुन्या मुंबई -पुणे महामार्गाच्या रस्तारूंदीच्या ( Pune ) कामाचा सातत्याने पाठपुरावा घेत असून, खडकीतील वाहतुकीचा प्रश्न लवकरच सुटेल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज  पत्रकारांना सांगितले.

महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे खडकी भागात जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्यावर येणाऱ्या अडथळ्यांची पाहणी करून ते अडथळे दूर करण्याबाबत, संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आमदार शिरोळे यांनी सविस्तर चर्चा केली.

Pimpri : दुर्गामाता बचत गटाच्यावतीने वृक्षारोपण

त्याचप्रमाणे बोपोडी चौक ते ऑल सेंट स्कूल दरम्यानचा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी दोन चाकी, तीन चाकी, व चार चाकी वाहनांसाठी दि. 1 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणार आहे. तसेच खडकी एलिफिस्टन रोड वरून जुन्या पुणे–मुंबई महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत साधारण दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागणार असल्यामुळे या ठीकाणाहून जड वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे.

 

यामुळे खडकी भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले. रूंदीकरणाचे 80 टक्के काम पूर्ण झालेले आहे, उर्वरित काम येत्या 3 ते 4  महिन्यात पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 

या पाहणी दरम्यान प्रकाश भाऊ ढोरे, गणेश बगाडे, आनंद छाजेड, धर्मेश शहा, शाम काची, गणेश स्वामी, सुभाष पाडळे, देवेंद्र बिडलान, प्रवीण बिडलान, संकेत कांबळे, राहुल कांबळे, अजित पवार, नेहाताई गोरे, अतुल गायकवाड, राजू पिल्ले, अनिल भिसे, खडकी वाहतूक पोलीस विभागाचे मासाळकर, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी गोजारे तसेच भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक ( Pune ) उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.