Pune : बुधवार पेठ येथील पटवर्धन वाड्याची भिंत कोसळली, सुदैवाने जिवीत हानी नाही

 एमपीसी न्यूज – बुधवार पेठेतील पटवर्धन वाड्याचा काही भाग (  Pune) कोसळल्याची घटना मंगळवारी (दि.20) दुपारी घडली. या घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले. बुधवार पेठेत पटवर्धन वाडा आहे. मंगळवारी दुपारी वाड्यातील आतील बाजूची भिंत कोसळली.

Chakan : महावितरणकडून चाकण उपविभागाचे विभाजन; नवीन चाकण एमआयडीसी उपविभागाची निर्मिती

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी तातडीने मदतकार्य सुरु केले.वाड्यात अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले. त्यांना किरकोळ स्वरुपाची दुखापत झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी पंकज जगताप यांनी (  Pune) दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.