Pune : काँग्रेसच्यावतीने शहीद जवानांना अभिवादन

Tribute to the martyred soldiers on behalf of the Congress

एमपीसी न्यूज – पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मराठा शहिद स्मारक कॅम्प येथे पुष्पचक्र वाहून व मेणबत्त्या प्रज्वलित करून ‘शहिदो को सलाम दिवस’ पाळण्यात आला. शहिदांप्रती आपल्या भावना व्यक्त करताना राष्ट्रध्वजही लावण्यात आला होता. शहीद जवानांना वंदन करून भारताच्या सशस्त्र सैन्य दलाच्या समर्थनार्थ व चीन सैनिकांनी हडपलेली भारतभूमी परत घेण्याची मागणी उपस्थित कार्यकर्त्यांनी केली.

_MPC_DIR_MPU_II

माजी आमदार मोहन जोशी म्हणाले, भारत – चीन सीमेवरील गलवान खोरे येथील जागेवर चीनने अतिक्रमण करून भारतीय जवानांची अमानुषपणे हत्त्या केली. त्या शहीद जवानांना वंदन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत. भारतीय लष्करावर पूर्णपणे विश्वास ठेवून चीनी सैनिकांनी हडपलेली आपली भूमी केंद्र सरकारने लवकरात लवकर परत मिळवावी यासाठी खासदार राहुल गांधी यांनी देशभर आवाज उठविला, असे  जोशी यांनी  सांगितले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे, काँग्रेस गटनेते आबा बागुल, वीरेंद्र किराड, नगरसेविका सुजाता शेट्टी, लता राजगुरू, रफिक शेख, सचिन आडेकर, राजेंद्र शिरसाट, प्रदीप परदेशी, संजय कवडे, क्लेमेंट लाजरस, विशाल मलके, प्रकाश पवार, शिलार रतनगिरी, यासिन शेख, अनिस खान, विठ्ठल गायकवाड, प्रशांत सुरसे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.