Pune: विधान परिषदेवर विविध विषयांतील तज्ज्ञ-अभ्यासकांची निवड व्हावी, यासाठी ‘सजग जनतेचे’ अनोखे आवाहन

Pune Unique appeal of 'sajag janta' for selection of experts in various disciplines on Legislative Council या सदस्यांनी गेली अनेक वर्षे, सातत्याने त्यांच्या विषयात मोठं योगदान दिलं आहे. शिवाय समाजहिताचे, पर्यावरणसंरक्षणाचे, संशोधनाचे आणि इतर अनेक उपक्रम व प्रकल्प हाताळले, राबवले आहेत.

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर विविध विषयांतील तज्ज्ञ-अभ्यासकांची निवड व्हावी, यासाठी सजग जनतेचे अनोखे आवाहन आणि अभियान राबविण्यात आले.

पर्यावरणतज्ज्ञ – अभ्यासक, निसर्गशास्त्रज्ञ, विविध हरित चळवळीचे प्रणेते डॉ. सचिन पुणेकर, आर्किटेक्ट व हरित चळवळीतील कार्यकर्ते सारंग यादवाडकर, इंजिनियर व माहिती अधिकार या विषयातील ज्येष्ठ तज्ज्ञ विवेक वेलणकर, भूवैज्ञानिक व जलअभ्यासक उपेंद्र धोंडे, भविष्यातील नियोजन, शासकीय यंत्रणा, प्राध्यापक व पर्यावरण चळवळीच्या क्षेत्रात दीर्घ अनुभव असणारे डॉ. अनुपम सराफ, जलभूवैज्ञानिक, भूजलतज्ज्ञ डॉ. हिमांशू कुलकर्णी या विषयतज्ज्ञांचा समाजसेवकांचा राज्यपाल नियुक्त महाराष्ट्र विधानपरिषदेवर नियुक्ती व्हावी यासाठी त्यांच्या नावाचा समावेश आहे.

या सदस्यांनी गेली अनेक वर्षे, सातत्याने त्यांच्या विषयात मोठं योगदान दिलं आहे. शिवाय समाजहिताचे, पर्यावरणसंरक्षणाचे, संशोधनाचे आणि इतर अनेक उपक्रम व प्रकल्प हाताळले, राबवले आहेत.

त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी गुगल लिंक देण्यात आली आहे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत संबधित लोकांना जाणून घेता येईल.

राज्यपालांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता भारतीय घटनेच्या आर्टिकल 163 (2) व 171 (5) नुसार आपले अधिकार वापरून वर नमूद विषयतज्ज्ञांना-समाजसुधारकांना महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील सजग जनतेने, विविध सेवाभावी संस्थांनी, पर्यावरण क्षेत्रातील तळमळीने कार्य करणाऱ्या व्यक्तींनी एकत्रित येवून महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी सहा विषयतज्ज्ञांची नावे महामहिम राज्यपाल यांना सुचविली आहेत. त्याबाबतचा राज्यपालांशी पत्रव्यवहार देखील झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.