Pune Water Cut: सणासुदीचे दिवस लक्षात घेता पाणीकपात तूर्तास मागे

पुणे महानगरपालिकेचा निर्णय

एमपीसी न्यूज: पुणे महानगरपालिकेतर्फ पुणे शहरात एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (Pune Water Cut) मात्र आषाढी एकादशी व बकरी ईद हे सण लक्षात घेता नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी या कालावधीत मुभा देण्यात आली आहे. मात्र या काळात नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा.

सोमवारपासून पुण्यात लागू करण्यात आलेली पाणीकपात शुक्रवारपासून मागे घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.  आषाढी एकादशी आणि ईदचा सण असल्याने ही पाणीकपात मागे घेत असल्याच महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांमधील पाण्याची पातळी खाली गेल्याने सोमवारपासून सात दिवसांसाठी पाणीकपात लागू करण्यात आली होती.(Pune Water Cut)  मात्र गेले दोन दिवस पुण्यात आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत असुन पाणी साठ्यात देखील वाढ झालीय.

Pcmc Election 2022: अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी 16 जुलैपर्यंत मुदतवाढ

सणासुदीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ही पाणी कपात तूर्तास मागे घेण्यात आली आहे. दि. 8 जुलै ते ११ जुलै या कालावधीत दररोज पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यानंतर परिस्थिती बघून निर्णय घेण्यात येणार असल्याचं पाणीपुरवठा विभाग अभियंता अनिरूध्द पावस्कर यांनी सांगितल आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.