Pcmc Election 2022: अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी 16 जुलैपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका (Pcmc Election 2022) निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतींची पडताळणी करून अंतिम मतदार यादी तयार करण्यासाठी महापालिकेला मुदतवाढ मिळाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने  एका आठवड्याची मुदतवाढ दिली आहे. 16 जुलै पर्यंत अंतिम मतदार यादी तयार करावी लागणार आहे. याबाबतचा आदेश आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी आज (बुधवारी) महापालिकेला दिला आहे.

निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीची फोड करून तीनच्या प्रभागानुसार प्रारूप मतदार यादी तयार केली. पण, ही मतदार यादी तयार करताना मोठ्याप्रमाणात घोळ झाला आहे. यामध्ये प्रारूप यादी तयार करताना क्षेत्रीय कार्यालयावर संगनमत करून नावे यादीत टाकली आहेत. त्यात अनेक बोगस मतदार टाकल्याने त्याचा फटका निवडणुकीत बसणार आहे असाही आरोप झाला होता. त्यामुळे बहुतांश सर्व प्रभागातील हजारो मतदार दुसऱ्या प्रभागात गेले आहेत. त्यामुळे हक्काचे मतदार दुसरीकडे गेल्याने इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत.

Pimpri Corona Update: शहरात आज 284 नवीन रुग्णांची नोंद; 208 जणांना डिस्चार्ज

प्रारूप मतदार यादीवर तब्बल 8 हजार 700 नागरिकांच्या हरकती आलेल्या आहेत. हरकतीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांची तपासणी करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी लागणार आहे. हरकतीचा निपटारा करावा लागणार आहे. हवामान खात्याने पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या कालावधीत प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करणे जिकरीचे आहे.

त्यामुळे 9 जुलै पर्यंत अंतिम मतदार (Pcmc Election 2022) यादी तयार अशक्य आहे. त्यासाठी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी महापालिकेने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने 16 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.