Pune Water supply News : पुण्याच्या काही भागात गुरूवारी पाणी पुरवठा बंद

एमपीसी न्यूज – वडगाव जलकेंद्र तसेच विमाननगर धानोरी येथील पंपींग स्टेशनवर गुरूवारी (दि. 5) तातडीचे विद्युत व स्थापत्य विषयक काम करायचे आहे. त्यामुळे येथील पाणी पुरवठा गुरुवारी दिवसभर बंद राहणार आहेच, तर शुक्रवारी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणी येणार आहे, असे पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे कऴविण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे

वडगाव जलकेंद्र परिसर – हिंगणे, आनंदनगर, वडगाव,धायरी,आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी.

भामा आसखेड प्रकल्प

विमाननगर टाकी परिसर – संजय पार्क,संपुर्ण विमाननगर, म्हाडा कॅलनी,एस.आर.ए. भाग, कुलकर्णी गॅरेज भाग, यमुना नगर,दत्त मंदिर परिसर इ.

धानोरी टाकी परिसर – कमल पार्क, माधव नगर, धानोरी गावठाण, परांडे नगर, लक्ष्मी नगर, गोकुळ नगर, भैरवनाथ, काशिनाथ नगर, आनंद पार्क, श्रमिक नगर,

सिध्दार्थ नगर, सुदामा नगर, अंबानगरी,हरिकृष्ण पार्क इ.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.