Pune : जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी?; अजित पवार की दिलीप वळसे-पाटील?

एमपीसी न्यूज – विधानसभा अध्यक्षपदी दिलीप वळसे-पाटील यांची निवड होणार असल्याची चर्चा होती. मात्र, काँगेसतर्फे हे पद जेष्ठ आमदार नाना पाटोले यांना देण्यात आले आहे. त्यामुळे आता पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागेल? याबाबत अनेकांमध्ये कमालीची उत्सुकतात आहे. यासाठी सध्या अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

पुणे जिल्ह्यातून अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळे पालकमंत्रीपदी पवार की वळसेपाटील याची उत्सुकता लागली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे समजते. काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. या सरकारकडून पुणेकरांना खूप अपेक्षा आहेत.

यावेळी पुणेकरांनी राष्ट्रवादीला दोन आमदार दिले. तर, जिल्ह्यातही चांगली ताकद दिली. शिवसेनेचा मात्र एकही आमदार यावेळी निवडून आला नाही. भाजपच्या आमदारांची संख्या कमी झाली आहे. पुणेकरांच्या पिण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी पालकमंत्री निवड होणे आवश्यक आहे. जलसंपदा खाते कोणत्या पक्षाकडे जाणार? याकडे लक्ष लागले आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात अजित पवार यांची मोठी ताकद आहे. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने शांतता आहे. त्यांचा समावेश तातडीने करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय निर्णय घेणार?, याकडे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.