Wakad : दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने पादचाऱ्याचा मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असलेल्या इसमाचा दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी मोबाईल फोन पळवला. ही घटना वाकड मधील सिल्वर स्पोर्ट्स क्लब येथे घडली.

राजीव रामानुज शर्मा (वय 40, रा. दत्त मंदिर रोड, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी राजीव हिंजवडी येथून कामावरून त्यांच्या वाकड येथील घरी जात होते. ते वाकड येथील सिल्वर स्पोर्ट्स क्लबजवळ आले असता पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांचा 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.