Pune : रिता इंडिया फाउंडेशनतर्फे अंध-अपंग-मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन

एमपीसी न्यूज – रिता इंडिया फाउंडेशनच्या (Pune) संस्थापिका डॉ. रिता शेटीया यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रिता इंडिया फाउंडेशन तर्फे ‘वेळेचे व्यवस्थापन आणि नेतृत्व गुण’ कार्यशाळेचे आयोजन ‘अनामप्रेम’ या अंध – अपंग – मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचा लाभ एकूण 15 विद्यार्थ्यांनी घेत काही खेळ आणि सादरीकरणाद्वारे मुलांना वेळेचे व्यवस्थापन, त्याचे महत्त्व, ते कसे करावे, त्याचे फायदे आणि नेतृत्व गुण, नेतृत्वाचे प्रकार आणि नेतृत्व कशा प्रकारे करावे या विषयी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी या 15 विद्यार्थांना अल्पोपहार आणि गिफ्टस चे वाटप करण्यात आले. यावेळी वास्तूशिल्प चे फाऊंडर मंगेश वाघमारे आणि सचिन सकपाळ , शिवानी बनकर, विशाल मुसळे आणि विद्या साठे यांनी आर्थिक साहाय्य करत रिता इंडिया फाउंडेशन करत असलेल्या कार्याचे कौतुक केले.

मयुरी महाकालकर, सचिन जाधव, जिगिष्या आणि हृदया मुसळे, ‘अनामप्रेम’ संस्थेचे प्रोजेक्ट कोआर्डीनेटर प्रल्हाद पांडव, स्न्हेहाधरचे उद्धवजी रामदासी, रिता इंडिया फाउंडेशनच्या (Pune) विश्वस्त संस्थापिका एच. सी. डॉ. सविता शेटीया यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य आणि केले.

Chinchwad Bye-Election: संशयास्पद व्यवहारांची माहिती पाठवा; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे बँकांना पत्र

यावेळी ‘अनामप्रेम’ संस्थेचे प्रोजेक्ट कोआर्डीनेटर प्रल्हाद पांडव म्हणाले, हि कार्यशाळा आमच्या दिव्यांग मुलांसाठी खूप आवश्यक होती. कारण आम्हालाही वेळेचे व्यवस्थापन कसे करावे?? नेतृत्व कसे करावे?? हे माहीत असणे आवश्यक होते. त्यांनी अशी कार्यशाळा वेगवेगळ्या विषयांवर आमच्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यात आयोजित करत राहावी., अशी ही इच्छा व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.