Chinchwad Bye-Election: संशयास्पद व्यवहारांची माहिती पाठवा; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे बँकांना पत्र

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या (Chinchwad Bye-Election) पोटनिवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये 10 लाख रुपयांपेक्षा अधिक रोकड जमा करणे किंवा काढण्याच्या व्यवहारांची, संशयास्पद वाटणाऱ्या 1 लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या व्यवहारांची माहिती बँकांना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे दररोज पाठवावी लागणार आहे. याबाबत चिंचवड मतदारसंघातील सर्व बँकांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील यांनी ही माहिती दिली. चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. आदर्श आचारसंहिता सुरु असून भंग होऊ नये यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने विविध पथके तयार करण्यात आली आहेत. निवडणुकीसंबंधी कोणत्याही आर्थिक गैरव्यवहारांची बाब निदर्शनास आल्यास त्यावर कारवाई केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांची माहिती चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्व बँकांना पाठविण्यात आली आहे.

चिंचवड (Chinchwad Bye-Election) मधील संशयास्पद वाटणाऱ्या व्यवहारांची दैनंदिन माहिती [email protected] या इमेल आयडीवर पाठविण्याबाबतचे लेखी पत्र सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील यांनी सर्व बँकांना पाठविले आहे.

Wakad : अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी विजय जगताप यांचा नागरिकांशी संवाद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.