Pune : मसाज सेंटरवर येरवडा पोलिसांचा छापा; सेक्स रॅकेट उघडकीस, एकाला अटक

एमपीसी न्यूज – मसाज सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी सेक्स रॅकेट उघडकीस आणले. तसेच सहा मुलींची सुटका करून एकाला अटक केली आहे. ही कारवाई काल रविवारी (दि 27) दुपारी 2 च्या सुमारास कल्याणीनगर येथील फोर्ट लिझा सोसायटीतील स्पा हेवन, लक्झरी स्वीडिश अँड थाई मसाज सेंटरवर करण्यात आली.

याप्रकरणी मॅनेजर सोमनाथ बनवारीलाल केडिया (वय 43,रा. कोरेगाव पार्क) याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा करून घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून एकूण 6 मुलींची सुटका करून एकास अटक केली.
केडीया हा मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असत. याप्रकरणी पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.