Chinchwad : घरफोडी करून चोराला सहा लाखांचा ऐवज

एमपीसी न्यूज – घरफोडी करून घरातून सुमारे 5 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 27) पहाटे साडेतीनच्या सुमारास उघडकीस आली.

प्रभाकर यशवंत दुवेदी (वय 67, रा. लक्ष्मीनगर, लिंक रोड, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रभाकर शनिवारी (दि. 26) दुपारी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यानंतर त्यांच्या घराचा दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले सुमारे 5 लाख 94 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. फिर्यादी रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला.

याबाबात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.