Pune : क्रेडीट कार्डच्या व्यवहाराची मर्यादा वाढविण्याच्या आमिषाने तरुणीची आठ लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – क्रेडीट कार्डच्या व्यवहाराची मर्यादा वाढविण्याच्या(Pune) आमिषाने तरुणीची आठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात गुन्हेगाराने तरुणीच्या नावाने बँकेकडून ऑनलाइन कर्ज काढल्याचे उघडकीस आले. याबाबत संबंधित तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Hadapsar : स्वयंपाकाच्या गॅसमधून गळती होऊन आग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हेगाराने काही दिवसांपूर्वी तक्रारदार तरुणीच्या मोबाईलवर फोन केला. एका खासगी बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. क्रेडीट लिमिट वाढविण्यात येणार असल्याचे सांगत त्याने तरुणीचा पॅनकार्ड तसेच बँक खाते क्रमांक घेतला.

या माहितीचा गैरवापर करून त्याने ऑनलाइन पद्धतीने तरुणीच्या नावावर आठ लाख रुपयांचे कर्ज काढले. ही रक्कम त्याने स्वत:च्या बँक खात्यात वळविली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार (Pune) दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.