Pune : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत प्राध्यापिकेकडे मागितली पाच हजार डाॅलरची खंडणी

एमपीसी न्यूज – लोणी काळभोर भागातील एका नामांकित शैक्षणिक (Pune ) संस्थेतील विद्यार्थ्याने 36 वर्षीय प्राध्यापिकेची आक्षेपार्ह व्हिडिओ , तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे पाच हजार डाॅलरची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी महाविद्यालयीन युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मयंक सिंग (वय 26, रा. पाटणा, बिहार) असे गुन्हा दाखल केलेल्या महाविद्यालयीन युवकाचे नाव आहे. याबाबत एका प्राध्यापक महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : क्रेडीट कार्डच्या व्यवहाराची मर्यादा वाढविण्याच्या आमिषाने तरुणीची आठ लाख रुपयांची फसवणूक

फिर्यादी या लोणी काळभोर येथील एका नामांकित शैक्षणिक संस्थेत प्राध्यापक आहे. मयंक सिंगने प्राध्यापिकेला समाजमाध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. त्यानंतर त्याने समाजमाध्यमातील संपर्क यंत्रणेचा वापर करुन प्राध्यापिकेला धमकावण्यास सुरुवात केली.

मी सांगितले तसे नाही केले तर समाजमाध्यमात तुमचे फोटो व्हायरल करुन बदनामी करेल, अशी धमकी त्याने दिली होती. त्यानंतर त्याने प्राध्यापिकेला धमकावून त्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला.त्यानंतर  व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तो  व्हिडिओ त्यांच्या पतीस पाठविला, तसेच त्यांच्याकडे पाच हजार अमेरिकन डाॅलरची मागणी केली.

आरोपीने दिलेल्या धमकीमुळे घाबरलेल्या प्राध्यापक महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गंधाले (Pune ) तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.