Pune : बाणेरमध्ये अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या मुंबईतील तरुणाला बेड्या, 8 लाखाचे मेफेड्रॉन जप्त

एमपीसी न्यूज : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी (Pune) पथकाने बाणेर परिसरातील योगी पार्कमधून एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना अमली पदार्थाचा साठा सापडला. पोलिसांनी या तरुणांकडून सात लाख 84 हजार रुपये किमतीचे 20 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केलं आहे.

आसिफअली अलीमुद्दीन शेख (वय 36, एस पी यादव निवास हॉल रोड, कुर्ला वेस्ट मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या या तरुणाचे नाव आहे. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बाणेर परिसरात एक व्यक्ती अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी योगी पार्क सोसायटी येथे सापळा रचून एका संशयितालाही ताब्यात घेतले.

त्याची अंग झडती घेतली असता पोलिसांना (Pune) सात लाख 84 हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ सापडले. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण करीत आहेत.

MPSC Student Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू; लाइट नाही म्हणून मोबाइल टॉर्च लावून आंदोलन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.