MPSC Student Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू; लाइट नाही म्हणून मोबाइल टॉर्च लावून आंदोलन

एमपीसी न्यूज : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे (Pune MPSC Student Protest) आंदोलन अजून सुरुच आहे. काल आंदोलनस्थळावरील स्ट्रीट लाईट बंद करण्यात आल्या होत्या. अशा वेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च लावत आंदोलन सुरूच ठेवले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2023 पासून राज्यसेवा परीक्षेत बदल करण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाविरोधात एमपीएससी विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून, या विद्यार्थ्यांच्या हातात आपल्या मागण्यांचे फलक झळकत होते. निर्णय झाला, अंमलबजावणी कधी, राज्य सेवा वर्णनात्मक मुख्य परीक्षा पद्धती 2025 पासूनच लागू करा, अशा मागण्या या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या.

विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी जयंत पाटील आले असता जयंत पाटील यांचं स्वागत विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या टॉर्चलावून केल्याचे पाहायला मिळालं.

Alandi : आळंदीमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.