Alandi : आळंदीमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी

एमपीसी न्यूज : आद्य पत्रकार, दर्पणकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर (Alandi) यांच्या जयंती निमित्त 20 फेब्रुवारी रोजी जनहित फाऊंडेशन, दक्षता फाऊंडेशन, नेचर फाऊंडेशन, एल्गार सेना,यशवंत संघर्ष सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्प अर्पण केले. व त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी सचिन गिलबिले, उमेश रानवडे ,भागवत काटकर , बाळासाहेब कवळासे विष्णू कुऱ्हाडे, व पत्रकार बांधव इ. मान्यवर उपस्थित होते. याबाबत माहिती किरण नरके यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.