Pune : पाळीव श्वानाचा पाय मोडल्याने दोन मित्रात हाणामारी; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज-लाडक्या पाळीव श्वानाचा पाय मोडल्याच्या (Pune ) कारणावरून दोन मित्रांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकाने दुसऱ्याला काठीने बेदम मारहाण केली. हा प्रकार रविवारी धनकवडी परिसरातील तिरुपती नगर मध्ये घडला.
याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात विशाल सुनिल पवार (वय-38) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गणेश आवळे (वय-38, रा. पांचाळ वस्ती, धनकवडी, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गणेश आवळे व विशाल पवार हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. दरम्यान, गणेश आवळे हा विशाल पवार यांच्या घराजवळ रविवारी दुपारच्या सुमारास आला. त्याने मी दिलेल्या पामोलिन श्वानाचा तु पाय मोडला आहेस, असे म्हणुन वाद घातला. त्याने विशाल याला काठीने मारहाण केली. त्यानंतर तो पसार झाला. पुढील तपास पोलीस नाईक (Pune )गायकवाड करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.