House burglary : बंद घरातील 4.78 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज : राहटणी मध्ये दोन घरातील 4.78 लाख (House burglary) रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गणेश हुलावळे,  वय 42 वर्षे, रा. निर्मल कॉलनी, श्रीनगर, रहाटणी यांनी वाकडma पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात छोट्या विरोधात भा.द.वि कलम 380, 454 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही चोरी 4 जानेवारी 2023 रोजी दुपारी 12:55 वाजता ते 1.25 वा च्या दरम्यान निर्मल कॉलनी, श्रीनगर, रहाटणी येथे घडली आहे.

Pune News : पुण्यात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’

फिर्यादी यांच्या राहत्या घराचे कुलूप व कोयंडा अज्ञात इसमाने हत्याराने तोडून त्या वाटे घरामध्ये प्रवेश करून घरातील असलेल्या लोखंडी कपाटाचे लॉकरचे लॉक तोडून (House burglary) त्यामध्ये असलेले फिर्यादीचे 4.54 लाख रुपये किंमतीचे 22 तोळे सोन्याचे दागिने चोरी करून नेले आहेत.

तसेच फिरदी यांचा भाऊ योगराज हुलावळे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून या अज्ञात चोरट्याने घरामध्ये प्रवेश करून बेडरूम मध्ये असलेल्या लोखंडी कपाटातून 23,750 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.