Rahu heavy rain : राहू गावात मुसळधार पाऊस

एमपीसी न्यूज :  दोन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे राहू गावातील दुकानांमध्ये, सोसायटींमध्ये व शेतामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे.(Rahu heavy rain)त्यामुळे दुकानातील मालाचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे शेतपीकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दुकानदार राम ताकवले म्हणाले की काल पुर्ण दिवस, व आज दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवपार्वती शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये तळमजल्यावरील दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसल्यामुळे दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. गावातील काल झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांची झालेल्या नुकसानीचे पाहणी व पंचनामे सरपंच दिलीप देशमुख, उपसरपंच गणेश शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य किसन शिंदे, तलाठी आनंद ढगे व ग्रामसेवक गोरख थोरात यांनी केले.

ग्राम विकास अधिकारी गोरख थोरात म्हणाले की, मेन बाजारातील शिवपार्वती शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये 25 ते 30 दुकानांमध्ये 4 ते 5 फूट उंचीपर्यंत पाणी शिरले होते.(Rahu heavy rain) त्यामुळे दुकानांमध्ये साठवण्यात आलेल्या मालाचे नुकसान झाले आहे. तसेच राहू- वाघोली रस्त्याचा बराच भाग वाहून गेला आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांमधील एकाच दिवसात झालेल्या हा सर्वाधिक पाऊस आहे.

Pimpri News : राजे उमाजी नाईक यांचे कार्य कायम स्मरणात राहील – उमा खापरे

सरपंच दिलीपराव देशमुख म्हणाले की,ओढ्याचे पुराचे पाणी शिवपार्वती शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये घुसले होते. त्याच्याजवळ पार्क केलेल्या गाड्या भोवती पुराचे पाणी साचले होते. त्यामुळे आमची मागणी आहे की, या ओढ्याचे खोलीकरण करावे. तसेच त्याच्यावर नवीन पूल बांधावा त्याची उंची व रुंदी आताच्या सीडीवर पेक्षा जास्त असावी जेणेकरून पुराच्या पाण्याचा लवकर निचरा होईल व ते साचणार नाही.(Rahu heavy rain) गावापासून चार किलोमीटर लांब असलेल्या नवले मळ्यातून एक वॅन वाहून गेली होती पण नंतर ती तेथून दुरवर शोधल्यावर सापडली आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील बांधबंधिस्ती वाहून गेले आहेत. तसेच मका व बाजरी आणि उसाच्या लागवडीवरती परिणाम झाला आहे. जोरदार वारा व पावसामुळे आमच्या डाळिंब बागेचे खूप नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.