Railway News : मध्य रेल्वे पुणे-दानापूर दरम्यान सोडणार विशेष रेल्वे

एमपीसी न्यूज – आगामी दिवाळी आणि छठ या सणांच्या ( Railway News)  पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने पुणे-दानापूर दरम्यान विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 12 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत प्रत्येक रविवार, बुधवार आणि मंगळवारी या विशेष रेल्वे पुणे स्थानकावरून सुटणार आहेत.

01417 पुणे – दानापुर एक्सप्रेस गाडी 12 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान प्रत्येक रविवारी पुणे स्थानकावरून सकाळी 06.35 वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 11.40 वाजता दानापुर येथे पोहोचेल. त्यानंतर 01418 दानापुर – पुणे एक्सप्रेस गाडी 13 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान प्रत्येक सोमवारी दुपारी 01.30 वाजता दानापुर येथून सुटेल. दुसऱ्या दिवशी ही गाडी सायंकाळी 06.20 वाजता पुणे येथे पोहोचेल. या गाडीत 18 एसी थ्री इकोनॉमी कोच असतील.

Alandi : आंदोलनकर्ते भगवान महाराज कोकरे यांची प्रकृती खालावल्याने केले रुग्णालयात दाखल

01419 पुणे – दानापुर एक्सप्रेस गाडी 15 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर या कालावधीत ( Railway News) प्रत्येक बुधवारी दुपारी 03.15 वाजता पुणे स्थानकावरून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी 07.00 वाजता दानापुर येथे पोहोचेल. त्यानंतर 01420 दानापुर – पुणे एक्सप्रेस गाडी 16 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान प्रत्येक गुरुवारी रात्री 10.40 वाजता दानापुर येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सकाळी 05.50 वाजता पुणे येथे पोहोचेल. या गाडीत 18 एसी थ्री इकोनॉमी कोच असतील.

01421  पुणे – दानापुर एक्सप्रेस गाडी 14 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत प्रत्येक मंगळवारी सकाळी 06.35 वाजता पुणे येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी 11.40 वाजता दानापुर येथे पोहोचेल. त्यानंतर 01422 दानापुर – पुणे एक्सप्रेस गाडी 15 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर या कालावधीत प्रत्येक बुधवारी दानापुर येथून दुपारी 01.30 वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी 07.40 वाजता पुणे येथे पोहोचेल. या गाडीत 18 द्वितीय श्रेणी चेयर कार कोच असतील.

ही गाडी अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा स्थानकावर ( Railway News) थांबेल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.