Railway News : मालवाहतुकीतून रेल्वेने मे महिन्यात कमावले 14 हजार 642 कोटी रुपये

एमपीसी न्यूज – भारतीय रेल्वेने मे 2023 मध्ये, 134 मेट्रिक टन मालवाहतूक (Railway News) केली. यातून रेल्वेला 14 हजार 641.83 कोटी रूपये उत्पन्न मिळाले. हे उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत चार टक्क्यांनी अधिक आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात 131.50 मेट्रिक टन मालवाहतूक रेल्वेने केली होती. रेल्वे मालवाहतुकीमधून मे 2022 मध्ये 14 हजार 83.86 कोटी रूपये उत्पन्न मिळवले होते.

एप्रिल – मे 2023 मधील एकत्रित आकडेवारी पाहिली तर रेल्वेने 260.28 मेट्रिक टन मालाची वाहतूक केली. गेल्या वर्षी याच काळात रेल्वेने 253.48 मेट्रिक टन माल वाहून नेला आहे. म्हणजेच मालवाहतुकीमध्‍ये सुमारे 3 टक्क्यांची सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षी रेल्वेने माल वाहतुकीतून 27 हजार 66.42 कोटी रुपयांची कमाई केली होती. यंदाच्या वर्षी रेल्वेने 28 हजार 512.46 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही कमाई सुमारे 5 टक्यांनी वाढली आहे.

Pune : समाजकल्याण विभागाला वसतिगृहासाठी हवीय भाड्याची इमारत

भारतीय रेल्वेने 65.89 मेट्रिक टन कोळशाची मालवाहतूक केली. त्याखालोखाल लोहखनिजाची 15.23 मेट्रिक टन, सिमेंटची 13.20 मेट्रिक टन वाहतूक केली. तर उर्वरित 10.96 मेट्रिक टन इतर सामुग्रीची वाहतूक केली. कंटेनरच्या माध्‍यमातून 6.79 मेट्रिक टन, तर 4.89 मेट्रिक टन खतांची वाहतूक केली, 4.85 मेट्रिक टन अन्नधान्याची आणि 4.23 टन खनिज तेलांची वाहतूक रेल्वेने मे 2023 मध्ये केली आहे.

‘हंग्री फॉर कार्गो” या मंत्राला अनुसरून, भारतीय रेल्वेने व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी तसेच स्पर्धात्मक किमतीत (Railway News) सेवा वितरण यामध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. ग्राहक केंद्रित दृष्टीकोन आणि लवचिक धोरण तयार करून व्यवसाय विकास कार्य केल्यामुळे रेल्वेला हे यश मिळवणे शक्य झाले असल्याचे भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.