Pune News : वसंत मोरे घेणार राज ठाकरे यांची भेट!

एमपीसी न्यूज – मशिदीसमोर भोंगे लावण्यावरून झालेल्या मतभेदावरून मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना पदावरून हटविण्यात आले. मात्र त्यांना अखेर राज ठाकरे यांनी बोलविले आहे. त्यानुसार वसंत मोरे येत्या सोमवारी राज ठाकरे यांच्या भेटीला जाणार आहेत. वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.

वसंत मोरे यांनी गुरूवारी रात्री यांनी राज ठाकरे यांना मेसेजही पाठविला होता. मात्र राज ठाकरे यांनी मेसेजही रिप्लायही दिला नव्हता. मात्र काही वेळातच मनसेचे नेते बाबू वागस्कर हे राज ठाकरे यांचा निरोप घेऊन वसंत मोरे यांच्या घरी गेले. राज ठाकरे यांनी सोमवारी बोलाविल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सोमवारी या बैठकीत काय होणार याची उत्सुकता आहे.

वसंत मोरे यांच्या भूमिकेनंतर मनसेच्या गोटात गोंधळ होता. त्यामुळे राज ठाकरे यांनी गुरूवारी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली होती. या बैठकीला बाबू वागस्कर, अनिल शिदोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांना बोलावले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.