BNR-HDR-TOP-Mobile

Rajgurunagar : हुतात्मा राजगुरू यांचे युवकांना प्रेरणा देणारे स्मारक उभारावे- सत्यजित तांबे

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- आज शहीद दिनानिमित्त हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मगावी राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू , भगतसिंग, व सुखदेव यांच्या स्मारकास महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी भेट देऊन तेथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात केले.

या प्रसंगी बोलताना सत्यजित तांबे म्हणाले, “राजगुरूनगर येथे युवकांना प्रेरणा देणारे स्मारक उभारण्यात यावे. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जसे गांधी विचाराचे आहेत, तसेच ते शहीद भगतसिंग, राजगुरू व सहदेव यांच्या विचाराचे देखील आहेत, हुतात्मा राजगुरू महाराष्ट्रचा मातीत जन्माला आले हे आपले सर्वांचे भाग्य आहे व याचा सर्वांना अभिमान देखील आहे, रोज शहिदांचे स्मरण करून देशहितासाठी युवकांने काम केले पाहिजे” अशी अपेक्षा व्यक्त केली.

या प्रसंगी पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ दौंडकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयूर जयस्वाल, दीपक ठिगळे, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बोर्डे, पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसचे चंद्रशेखर जाधव, तुषार पाटील, वसीम शेख, विशाल कसबे, जिफिन जॉन्सन, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A4

.