Rajiv Kapoor Passed Away : अभिनेते राजीव कपूर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध अभिनेते राजीव कपूर (58) यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने आज (दि.9) निधन झालं. दिवंगत अभिनेता ऋषी कपूर व रणधीर कपूर यांचे ते धाकटे बंधू होते.

अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

रणधीर कपूर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी माझा धाकटा भाऊ आज गमावला आहे. आता तो या जगात नाही. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. मी आता रुग्णालयात आहे आणि त्याचं शव मिळण्याची वाट पाहतोय. नीतू कपूर यांनीदेखील राजीव कपूर यांचा फोटो शेअर करत श्रद्धांजली दिली आहे.

राजीव कपूर यांनी राज कपूर दिग्दर्शिक ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यांनी चित्रपटात जास्त काम केलं नाही. ऋषी कपूर यांचा सुपरहिट चित्रपट ‘प्रेम ग्रंथ’ या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील केलं होतं.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.