Pune News : रंगत संगत प्रतिष्ठानचा प्रेमकवी पुरस्कार मृणालिनी कानेटकर-जोशी यांना जाहीर

एमपीसी न्यूज : रंगत संगत प्रतिष्ठान काव्य विभागातर्फे प्रेम दिवसानिमित्त सर्वोकृष्ट प्रेमकवी पुरस्कार प्रसिद्ध कवयित्री मृणालिनी कानेटकर-जोशी यांना येत्या (Pune News) सोमवारी (दि.13)प्रदान केला जाणार आहे. या निमित्ताने ‘प्रेम’ या विषयावर अनोख्या कविता ऐकण्याची संधीही मिळणार आहे, अशी माहिती रंगत संगत प्रतिष्ठानचे संयोजक अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे दिली.

कार्यक्रम सोमवार, दि 13 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन येथे होणार आहे. पुरस्कार वितरण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवयित्री डॉ. संगीत बर्वे यांच्या हस्ते होणार असून प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Pune News : पुणेकरांना बसणार करवाढीचा झटका; मालमत्ता करात मोठी वाढ होणार?

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रेम या विषयावर कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात स्वप्निल पोरे,  बंडा जोशी, उद्धव कानडे, डॉ. ज्योती रहाळकर, तनुजा चव्हाण, प्राजक्ता वेदपाठक, निरूपमा महाजन, अपर्णा डोळे, प्रसन्नकुमार धुमाळ, अमृता जोशी, डॉ. मृदुला कुलकर्णी-खैरनार,(Pune News) केतकी देशपांडे, प्रभा सोनवणे, शिल्पा देशपांडे आणि ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा महाजन यांचा सहभाग असणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

https://youtu.be/OHBf_mvUvN4

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.