Pune Bye-Election : पुणे पोटनिवडणूकीतून आपची माघार

एमपीसी न्यूज : कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा अवधी संपलेला आहे. (Pune Bye-Election)  कसबा विधानसभा पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे. या निर्णयानुसार आपचे उमेदवार किरण कद्रे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेतला.  दरम्यान, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत ‘आप’च्या उमेदवाराचा अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध ठरला होता.या निवडणुकीतून संभाजी ब्रिगेडनं याआधी माघार घेतली तर आता आपनेही माघार घेतली आहे.

आता आम आदमी पार्टीने देखील महाराष्ट्रातील विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार, किरण कद्रे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली अशी घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांनी केली.

Pune News : रंगत संगत प्रतिष्ठानचा प्रेमकवी पुरस्कार मृणालिनी कानेटकर-जोशी यांना जाहीर

दिल्लीतील वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उत्तम आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासकीय सेवा यांचे विकासाचे मॉडेल लोकांना मनापासून आवडले आहे. पंजाबमध्येही याच मॉडेलच्या धर्तीवर आम आदमी पक्षाच्या सरकारचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल राज्यातील जनतेमध्ये लवकरच येतील आणि याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून होईल.

सध्या आम आदमी पक्षाने  विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्ष  श्रेष्ठींच्या आदेशानुसार किरण कद्रे यांनी (Pune Bye-Election) कसबा विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीनिशी लढू आणि त्यानंतर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही जोमाने लढवणार असल्याचे आपकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.