Rapido Bike Taxi : रॅपिडोला उच्च न्यायालयाचा धक्का; तातडीने सेवा बंद करण्याचे आदेश

एमपीसी न्यूज : Rapido या बाइक टॅक्सी सेवा (Rapido Bike Taxi) देणाऱ्या कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने कंपनीला पुण्यातील सर्व सेवा तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. बाइक टॅक्सीसोबतच कंपनीच्या रिक्षा आणि डिलिव्हरी सेवाही परवाना नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. रॅपिडो टॅक्सी सेवेबाबत सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने कंपनीला शुक्रवारी दुपारी 1 वाजल्यापासून सर्व सेवा बंद करण्याचे निर्देश दिले.

रॅपिडोच्या दुचाकी प्रवासी वाहतुकीसंदर्भात उच्च न्यायालयात पुढील सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे.  13 जानेवारी रोजी सुनावणी दरम्यान Rapido ने उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले. ज्यामध्ये त्यांनी एग्रीगेटर्ससाठीच्या 2020 सालच्या मार्गदर्शक सूचनांच्या आवश्यकतानुसार स्वतंत्र अनुपालन केले असल्याचे सांगितले आहे.

PCMC : आयुक्तांसह तीन अधिकारी जाणार दुबई दौ-यावर

रोपेनच्या (Rapido Bike Taxi) सादरीकरणाच्या पार्श्वभूमीवर ज्या राज्यांमध्ये धोरणात्मक आराखडे अस्तित्वात आहेत. त्यामध्ये प्रो-टेम लायसन्ससह परवाने Rapido ला देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने रोपेनला परवाना आणि सहायक साहित्य (धोरणे) रेकॉर्डवर ठेवण्यासाठी एक प्रतिज्ञापत्रक 17 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील पुढील सुनावणी शुक्रवार 20 जानेवारी रोजी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.