Pune : पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा

एमपीसी न्यूज – पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात दाखल याचिकेवर (Pune) आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची आहे. स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले.

पुण्यातील भिडे वाडा येथे महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (Pune) यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. ही वास्तू महिलांसाठी प्रेरणास्थान आहे. भावी पिढीने देखील त्यातून सामाजिक कार्याची आणि शिक्षणाची प्रेरणा घ्यावी यासाठी या वाड्याचा राष्ट्रीय स्मारक म्हणून विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Pune : पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचा वृत्तपत्र विक्रेता दिन दिमाखात साजरा

स्मारकासाठी झालेल्या भूसंपादनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात वाड्यातील भाडेकरूंनी याचिका दाखल केली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीत वाड्याची जागा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. यामुळे स्मारकासाठीच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला असून स्मारकाच्या कामाला गती येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भिडेवाडा संदर्भातील उच्च न्यायालयातील खटला पुणे महापालिकेने जिंकला असून त्यांच्या लढ्याला मोठं यश आलं आहे. लवकरच भिडेवाड्यात राष्ट्रीय स्मारकाचं काम सुरू केलं जाईल. भिडे वाड्यात स्त्रियांसाठी शिक्षणाचं दार खुली करून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिला व शोषितांच्या आयुष्यात आशेचा उजाड पाडला.

त्याच भिडे वाड्याचं राष्ट्रीय स्मारक करावं, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. परंतु कायदेशीर अडचणींमुळे या स्मारकाचं काम रखडलं होतं. समता परिषद, पुणे महापालिका, राज्य सरकार यांनी याकामी दीर्घ लढा दिला. पुणे महानगरपालिकेच्या हेरिटेज वास्तूं यादीत भिडेवाड्याचा समावेश आहे. ही ऐतिहासिक वास्तू पुणे महापालिकेच्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने 21 फेब्रुवारी 2006 रोजी मान्यता दिली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.