Pune : पुणे लोकसभा निवडणूक घेण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वागत

एमपीसी न्यूज -पुणे लोकसभा मतदारसंघाची तातडीने पोटनिवडणूक घ्यावी असा (Pune)आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाचे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.

“पुणे लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार गिरीशजी बापट यांचे निधन झाले तेव्हा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीस १५ महिन्यांचा अवधी शिल्लक होता.

लोकप्रतिनिधींचे निधन झाल्यानंतर पुढील (Pune)सार्वत्रिक निवडणुकीस जर ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ शिल्लक असेल तर तातडीने त्या मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी ही बाब संविधानात समुद आहे.

मात्र कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्याने राज्यात भाजपला पोषक वातावरण नाही ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आली आणि पोषक वातावरण नसल्याने पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्यास टाळाटाळ करण्यात आली.असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मांडले.

Pune : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला स्थगिती द्या : आयुक्त

ते पुढे म्हणाले ,आशिया खंडातील सर्वांत जलदगतीने विकसित होणारे शहर म्हणून आपल्या पुण्याची ओळख आहे.
माननीय उच्च न्यायालयाने तातडीने पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिले याचे आम्ही स्वागत करतो मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाची कार्यपद्धती बघता या आदेशाची अंमलबजावणी खरोखर होणार का हा मोठा प्रश्न आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.