Pune : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला स्थगिती द्या : आयुक्त

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील जुन्या वाड्यांना (Pune)झोपडपट्टी असल्याचा अभिप्राय देऊन तेथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

त्यानंतर त्याची दखल महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी घेतली आहे. कुमार यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला पत्र दिले असून अशा सर्व प्रकरणांना स्थगिती द्यावी, अशी सूचना केली आहे. पुणे महापालिकेच्या स्तरावर या प्रकाराची चौकशी करण्यासाठी त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

Pune : स्वरमय वातावरणात ‘सवाई गंधर्व ‘ चा प्रारंभ

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक जुने वाडे आहेत. (Pune)एकात्मिक बांधकाम नियमावलीतील तरतुदींमुळे त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. या दरम्यान, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने शहरातील एखाद्या भागात झोपडपट्टीसदृश भाग असल्यास आणि महापालिकेच्या संबंधित विभागाने त्याबाबत अभिप्राय दिल्यास अशा ठिकाणी झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविता येईल, असे पत्राद्वारे शासनाला कळविले होते. त्यानंतर पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि उपअभियंत्यांनी तसा अभिप्राय दिला होता. मध्यवर्ती भागातील ७० वाड्यांचे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत रुपांतर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला होता.

पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी यासंदर्भात आयुक्त कुमार यांच्याकडे तक्रार नोंदविली होती.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.