Pune : पुणे महापालिका विश्वविक्रम करणार ;पाच हजार पालक आपल्या पाल्यांना गोष्टी सांगणार

वर्ल्ड बुक कॅपिटलचा श्री गणेशा होणार

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या ( नॅशनल बुक ट्रस्ट) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (Pune)मैदानावर16ते 24 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने पाच हजार पालक आपल्या पाल्यांना आज गुरुवारी सकाळी आठ वाजता स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर गोष्टी सांगणार आहेत. पुणे महापालिकेतर्फे आयोजित होणाऱ्या या उपक्रमाची नोंद गिनेस बुक रेकॉर्डस् मध्ये केली जाणार आहे.

शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात ‘ वर्ल्ड बुक कॅपिटल ‘ होण्याची (Pune)क्षमता आहे. या विश्वविक्रमाच्या निमित्ताने युनेस्कोचे निकष पूर्ण करण्याचा महापालिकेकडून प्रयत्न होणार असून, पुण्याला वर्ल्ड बुक कॅपिटल बनवण्यासाठी श्री गणेशा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बातमधून लहान मुलांना कथा किंवा गोष्टी सांगण्याचे फायदे नमूद केले आहे. याद्वारे मुलांना आपल्या संस्कृती  इतिहासबद्दल माहिती मिळून ती लक्षात राहते. याचे शैक्षणिक फायदे सुद्धा आहे. याला अनुसरूनच पालकांकडून आपल्या पाल्यांना गोष्टी सांगण्याचा उपक्रम पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाला उद्योजक सूर्यकांत काकडे यांचे सहकार्य लाभले आहे.

Pune : फ्रेमबॉक्स इन्स्टिटयूटचा दीक्षांत समारंभ सोहळा उत्साहात

यासाठी पुणे महापालिकेकडून स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे. या तयारीचा आढावा महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी संयोजक राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, राहुल पाखरे आदी उपस्थित होते. या विश्वविक्रमासाठी सुमारे दहा हजार खुर्च्या समोरासमोर मांडण्यात आल्या आहेत.

या उपक्रमात पुणे महापालिकेच्या शाळा मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसह अनेक शिक्षण संस्थांच्या शाळेतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यावेळी सुमारे पाच हजार पालक आपल्या पाल्यांना विविध गोष्टी, कथा सांगणार आहेत. यापूर्वीचा, पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी किंवा कथा सांगण्याचा विश्वविक्रम चीनच्या नावे असून, तो तोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणजे नक्की काय ?

वर्ल्ड बुक कॅपिटल हा युनेस्कोचा एक उपक्रम असून, तो २३ एप्रिलपासून सुरू होतो. शहरामध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण पाया असतो. या अंतर्गत शहाराला एका वर्षासाठी पुस्तकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी वर्ल्ड बुक कॅपिटलचा दर्जा देण्यात देतो. युनेस्को वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून नियुक्त केलेली शहरे ही सर्व वयोगटातील वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि युनेस्कोची मूल्ये सामायिक करण्याच्या उद्देशाने उपक्रम राबवतात.

शांतता..पुणेकर वाचत आहेत या उपक्रमातही पुणे महापालिका सहभागी होणार आहे. महापालिकेच्या शाळा, क्षेत्रिय कार्यालये, रुग्णालये आदी ठिकाणी उस्फुर्तपणे दुपारी 12 ते 1 या वेळेत पुस्तकांचे वाचन करण्यात येणार आहे. सर्व पुणेकरांनी या उपक्रमात सहभागी होऊन, आपल्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन करावे.
– विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.