Today’s Horoscope 14 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 14 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – गुरुवार.

तारीख – 14.12.2023.

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष – सामान्य दिवस.

राहू काळ – दुपारी 01.30 ते 3.00.

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आज नक्षत्र – मूळ 9.47 पर्यंत नंतर पूर्वशाढा.

चंद्र राशी – धनू.

—————————–

मेष ( शुभ रंग – हिरवा)

उद्योग धंद्याच्या दृष्टीने थोडा विरोधी दिवस. व्यावसायिकाना काही अकस्मिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. नोकरीत वरिष्ठांच्या लहरी सांभाळाव्या लागतील.

वृषभ ( शुभ रंग- तांबडा)

फक्त आपल्याच भल्याचा विचार करा. आज भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊ नका. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

मिथुन  ( शुभ रंग- पिस्ता)

आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असेल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हौस मौज करताना कायद्याचे भान ठेवा. सतर्क रहा.

कर्क  ( शुभ रंग – मोतिया)

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे आवश्यक आहे. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करू नका. हाताखालच्या लोकांवर अंकुश गरजेचा आहे.

सिंह  ( शुभ रंग – राखाडी)

आज तुमचा मौज मजा करण्याकडे कल असेल. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय चांगले चालतील. कलावंतांना उत्तम संधी चालून येतील.

कन्या ( शुभ रंग- लाल)

स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात प्रगती दिसून येईल. नवोदित कलावंतांनी प्रयत्न वाढवावेत.

तूळ ( शुभ रंग- भगवा)

एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे. रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल. आज घराबाहेर वाद संभवतात.

वृश्चिक ( शुभ रंग – डाळिंबी)

आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. गरजेपुरता पैसा सहज उपलब्ध होईल. गृहिणी कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडतील. आनंदी दिवस.

धनु  (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध निर्माण होतील. उपवारांना स्थळे सांगून येतील. आवडते छंद जोपासण्यासाठी पैसा व वेळ खर्च कराल. इतरांच्या भानगडीत मध्यस्थी कराल.

मकर  ( शुभ रंग – निळा)

खर्चाचे प्रमाण वाढले तरी पैसा कमी पडणार नाही. कलाकारांचा परदेशात नावलौकिक होईल. आज प्रवासात असेल तर मात्र आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या.

कुंभ  (शुभ रंग- जांभळा)

पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. तुमचे कष्ट कारणी लागतील. व कार्यक्षेत्रात यशाची चाहूल लागेल. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा राहील.

मीन  ( शुभ रंग- मोरपंखी)

नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण राहील. अधिकारी वर्गास अधिकार वापरावे लागतील. कार्यक्षेत्रात अविश्रांत कष्ट करायची तुम्हाला आज तयारी ठेवावी लागेल.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.