Mpc News Vigil : वर्षाभरात शहरात 40 ठिकाणी दरोडे

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात जानेवारी ते नोव्हेंबर (Mpc News Vigil) या अकरा महिन्यात 40 ठिकाणी दरोड्याचा घटना घडल्या आहेत. त्यातील 38 घटना उघडकीस आल्या आहेत. तर दोन दरोड्यांचा तपास पोलिसांना लागलेला नाही.

शहरात वाहन चोऱ्या, सोनसाखळी चो-या, मोबाईल हिसकावणे, वाहनचो-या यांसारख्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. यातूनच पुढे दरोडे देखील टाकण्यास हे गुन्हेगार मागेपुढे पाहत नाहीत. काही जणांचे टोळके मिळून दरोडा टाकतात. अनेक वेळेला हे गुन्हेगार शस्त्रांचाही वापर करतात. शहरात मागील अकरा महिन्यात 8 ठिकाणी व्यावसायिक दरोडे तर 32 ठिकाणी तांत्रिक दरोड्याच्या घटना घडल्या आहेत.

Today’s Horoscope 14 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्ती धाक दाखवून, मारहाण करून अथवा गंभीर जखमी करून जबरदस्तीने चोरी करतात, तेंव्हा दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात येतो. याला दरोडा अथवा व्यावसायिक दरोडा म्हटले जाते. तसेच भांडण सुरू असेल आणि भांडणा-या, मारहाण करणाऱ्या व्यक्तींमध्ये पाच अथवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असेल त्यांनी जबरदस्तीने चोरी करण्याचा प्रयत्न केल्यास देखील दरोड्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात येतो. याला तांत्रिक दरोडा असेही म्हटले जाते.

दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांनी चोरट्यांचा डाव उधळून लावण्याच्या तीन घटना घडल्या असून या तिन्ही घटनेतील आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. चोरीची भूक वाढल्याने तसेच परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी चोरटे दरोडे घालतात. ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक दरोड्याच्या घटना (Mpc News Vigil) घडल्या.

अकरा महिन्यातील दरोड्याच्या घटना –

जानेवारी – 2
फेब्रुवारी – 4
मार्च – 2
एप्रिल – 2
मे – 2
जून – 2
जुलै – 5
ऑगस्ट – 5
सप्टेंबर – 3
ऑक्टोबर – 8
नोव्हेंबर – 4

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.