Ravet Crime : बेकायदेशीररित्या जागा बळकावत बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

एमपीसी न्यूज – बांधकाम व्यावसायिकाची (Ravet Crime) जागा बळकावत, जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सात जणाविरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला रावेत पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 1 जानेवारी 2014 ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीत रावेत येथील म्ह्स्केवस्ती येथील सर्वे नं 97/2 येथे घडला आहे.

याप्रकरणी बाळासाहेब व्यंकटराव गायकवाड (वय 48 रा. निगडी प्राधिकरण) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गोकुळ भिका म्हस्के (वय 50 रा. रावेत) याला अटक केली असून राजू गोकुळ म्हस्के (रा. रावेत), महिला आरोपी, नितीन छगनलाल जैन (रा. नेहरुनगर, पिंपरी), राहूल किरणराज चोपडा (रा.निगडी प्राधिकरण), दत्तात्रय रामचंद्र पवळे (रा.निगडी), कपील वसंतीलाल चोपडा (रा.निगडी प्राधिकरण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची विभागीय पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू म्हस्के व महिला आरोपीने (Ravet Crime) फिर्यादी यांची मालकीची रावेत येथील सर्वे नं.97/2 ही जमीन फिर्यादी यांच्या परवानगी शिवाय परस्पर आरोपी जैन, चोपडा, पवळे यांच्या एस.पी. डेव्हलपर्स यांना दिली. डेव्हलपर्स यांनी तेथे बेकायदेशीररित्या अतिक्रमण करत जागा बळकावण्याचा प्रयत्न केला. बाजारमुल्य अडीच कोटी असणारी जमीन खंडणी पोटी केवळ 50 लाख रुपयांना देण्यात आली. याबाबत जाब विचारला असता फिर्यादी यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. यावरून रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.